

तीन दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे शेतीचे नुकसान
प्रतिनिधी: शेख रमजान बिटरगांव ( बु )
मृग महिन्यात पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रेरणा एक महिना उशिरा झाल्या आहेत, एकदमच चार दिवसाच्या अतिवृष्टी पावसामुळे पैनगंगा नदी पात्रात पाणी तुडुंब भरल्यामुळे नदी नाल्याचे पाणी शेतामध्ये शिरले आहे, त्यामुळे कोवळी असलेली पिके सोयाबीन, कापूस,तूर, उडीद मूग हे सर्व पीक नदी नाल्याच्या पाण्याच्या वाढत्या पुरामुळे खरडून गेले आहे, हळद, ऊस, हे मजबूत पीक सुद्धा पाण्याच्या अति प्रवाहामुळे आडवे पडले आहे, व शेत जमीन सुद्धा खरडून खड्डे पडले आहेत, अशा निसर्गाच्या हानीमुळे शेतकऱ्यांच्या काळजाने पाणी सोडले आहे, चातारी,दिघडी, कारखेड या गावांमध्ये तर चक्क ढगफुटी पाऊस पडला आहे, ढगफुटी व मुसळधार पावसामुळे संपूर्ण उमरखेड तालुक्याच्या पैनगंगे नदीपात्राच्या काठावरील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे, बिटरगाव, ( बु ), भोज नगर तांडा, करंजी, सावळेश्वर,, पिंपळगाव, जेवली, मुरली, यासह संपूर्ण नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मुसळधार व ढगफुटी पावसामुळे संपूर्ण कोवळी पिके खरडून गेली आहे, हे बघून संपूर्ण शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे, तरी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना नदीकडच्या शेतिचे पिक पंचनाम्याचे आदेश देऊन तात्काळ पीक पंचनामे करावे, व हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे,,
