
पोंभूर्णा:- तालूक्यातील बोर्डा बोरकर येथील रहिवाशी श्री. दिलीप मारोती देवगडे वय ६० वर्ष यांनी बोर्डा बोरकर ते पोंभूर्णा मार्गावरील शेतातील विहिरीमध्ये आज दिनांक २१/०७/२०२५ सोमवारला दुपारी अंदाजे ३ ते ४ वाजताच्या दरम्यान उडी घेऊन स्वतःची जीवण यात्रा संपविली.. दिलीप देवगडे यांनी विहिरीत उडी घेतल्याची माहीती गावात पसरताच पोलीस पाटील बोर्डा बोरकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे पोलीस स्टेशन पोंभूर्णा यांना दिली असता पोंभूर्णा पोलीस घटणास्थळी दाखल झाले व गावकर्यांच्या मदतीने प्रेत विहिरीबाहेर काढण्यात आले असून पंचनामा करूण प्रेत शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभूर्णा येथे पाठविण्यात आले आत्महत्येचे मूळ कारण अजुन समजले नसून याचा तपास पोंभूर्णा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनात श्री. मडावी मेजर, रामटेके मेजर, वैद्य मेजर करीत आहेत.. मृताच्या पश्चात एक मूलगा तसेच विवाहीत मूलगी नातवंड असून कर्ता पुरुष असा अचानक निघून गेल्याने कुंटुबावर दुखःचे डोंगर पसरले आहे या घटणेमूळे बोर्डा बोरकर गावात शोककळा पसरली आहे
