
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225
तालुक्यातील पिंपळापुर येथील एका २६ वर्षीय युवकाने शेतातील झाडाला गळफास घेऊन जिवन यात्रा संपवली.हि घटना गुरुवारी २२ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान उघडकीस आली.
अरुण सोमाजी किन्हाके (२६) रा.पिंपळापुर असे आत्महत्या करणाऱ्या युवकांचे नाव असून तो मंगळवार पासून घरुन बेपत्ता होता.दरम्यान त्याचा शोध घेत असताना आज गुरुवारी २२ जुलै रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान त्याचा मृतदेह पिपंळापुर शेत शिवारातील सुधीर शेटे यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास लावून आढळून आला.या घटनेची माहिती वडकी पोलीसांना देण्यात आली होती.पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी राळेगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला होता.त्याचे पश्चात आई वडील तीन भाऊ व चार बहिणी असुन तो अविवाहित होता.
