तालुका स्तरावर सैनिक पब्लिक स्कूल वडकी चे वर्चस्व

.

सहसंपादक : रामभाऊ भोयर

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ व तालुका क्रीडा समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुका स्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा २०२४ – २५ चे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये यावर्षी सैनिक पब्लिक स्कूल वडकी चे वर्चस्व कायम राहिले असून शाळेतील खोखो, बुद्धिबळ, योगा, बॅडमिंटन, फुटबॉल, कुस्ती व कबड्डी या खेळामध्ये सहभागी विद्यार्थी जिल्हा पातळी साठी पात्र झालेले आहेत
शाळेतील व्यक्तिगत आणि सांघिक खेळासाठी एकूण १२५ विद्यार्थीनी जिल्हा पातळीवर भरारी घेतली आहे
ज्यामधे खोखो मधील १५ मुली, बुद्धिबळ ११, योगा १७ बॅडमिंटन ५, कुस्ती ४, कबड्डी १५, व फुटबॉल ४५ असे मिळून १२५ विद्यार्थी जिल्हा पातळी साठी पात्र झालेले आहेत तसेच फुटबॉल मधे विभाग चाचणी साठी सोहम गेडाम व सृष्टी परचाके या दोन विद्याथ्र्यांची निवड झाली आहे
सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मे. रणधीरसिंग दुहान सचिव श्री सत्यावनसिंग दुहान प्राचार्य श्री सचिन ठमके क्रीडा शिक्षक जितेंद्र यादव, राकेश कुमार व शाळेतील सर्व शिक्षकांनी कौतुक केले आणि सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला..