

सहसंपादक : रामभाऊ भोयर
चिखली ग्रामपंचायत चे कार्यक्षम सदस्य लोकेश दिवे यांच्या पुढाकारने चिखली (व) येथे डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले,चिखली गावातील प्रत्येक नागरिकांना शिबिराची माहिती मिळावी म्हणून लोकेश दिवे यांच्यामार्फत गावात दवंडी तसेच सोशल मीडिया च्या माध्यमातून माहिती दिली,व स्वतः संपूर्ण गावात फिरून डोळे तपासणीचे साठी यावे व स्वच्छ व सुंदर डोळे कसे राहतील यांचे महत्व पटवून दिले, लोकेश दिवे यांच्या प्रयत्नांना साथ देत गावाकऱ्यांनी सुद्धा उत्तम प्रतिसाद देत शेकडो नागरिकांनी डोळे तपासून घेतले,तसेच शिबीरामध्ये तपासणी झालेल्या लोकांना 50% कमी किंमतीमध्ये चष्मे उपलब्ध करून दिले त्यामुळे लोकेश दिवे यांची नागरिकांमध्ये काम करणारा मुलगा म्हणून पुन्हा एकदा गावात जोरदार चर्चा आहे, लोकेश दिवे तर्फे गावामध्ये खुप असे समाजउपयोगी कार्यक्रम सुरूच असते,यावेळी शिबिरामध्ये 300 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदविला व डोळे तपासणी पूर्ण केली या उपक्रमाचे गावात कौतुक होत असून लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे असेच कार्यक्रम भविष्यात सुरु राहील असे सांगण्यात आले, यावेळी स्वप्नील ठाकरे,मयुर जुमळे,दुर्वेश उमाटे,साहिल वनकर,क्षितिज घायवटे,आकाश वनकर,अभिलाष नागपुरे,शंकर वनकर,प्रदीप बरडे, सुनील बरडे यांच्या सह अनेक लोकांचे मार्गदर्शन लाभले व शिबिर यशस्वी झाले.
