
शेतकऱ्यांच्या शेताची संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे २९ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नाल्याला मोठ्या प्रमाणात पुर आल्याने येथील शेतकऱ्यांचे कपासी व तुर पिक खरडून नेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर रिधोरा येथील शेतकरी अविनाश बाबाराव जवादे हा अल्पभूधारक शेतकरी असून यांच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने यांच्या शेतातील कपाशी व तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे. तर गावालगत असलेल्या नाल्याला रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पाणी आलं असल्याने हे पाणी सुद्धा काही लोकांच्या घरात शिरले आहेत सदर 29 ऑगस्ट रोजी आलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यालगत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे येथील शेतकऱ्यांकडून सांगितल्या जात आहे. सदर नाल्यालगत असलेल्या शेताची संबंधित अधिकाऱ्यांनी मोक्का पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी येतील शेतकऱ्यांकडून होत आहे. सदर विहीरगाव येथील तलाव ओव्हर फ्लो होऊन वाहत असल्याने रिधोरा , विहीरगाव येथील नाल्यालगत असलेल्या घरांना धोका निर्माण होऊ शकतो ? याबाबत सुद्धा सबंधित अधिकारी यांनी नाल्यालगत असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा अशी मागणी रिधोरा, विहीरगाव येथील नागरिकांकडून होत आहे
