जबरी चोरी तीन महिन्यानंतर दुसऱ्या आरोपीला अटक


प्रतिनिधि : शेख रमजान बिटरगांव ( बु )


ढाणकी किनवट रोडवरील टेंभुरधरा कुरळी रस्त्याच्या मध्ये असलेल्या शेतामध्ये दुचाकीने जाणाऱ्या टेंभूरधरा येथील शेतकऱ्यास तीन महिन्यापूर्वी रस्ता अडवून लुटण्यात आले होते त्यातील एका आरोपीला घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अटक करण्यात आली होती मात्र यातील दुसरा आरोपी हा तीन महिन्यापासून फरार होता त्याला आता तीन महिन्यानंतर बुधवारी अटक करण्यात आली आहे.
बिटरगाव पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार प्रताप भोस यांच्या कार्यकाळात म्हणजे तीन महिन्यापूर्वी एक शेतकरी शेताकडे जात असताना त्याच्या जवळील दोन हजार रुपये व एक मोबाईल चोरट्यांनी रस्ता अडवून हिसकावून घेत पळ काढला होता ढाणकी किनवट रोडवर ही घटना घडल्यानंतर तत्कालीन ठाणेदार प्रताप भोस यांनी या जबरी चोरीचा छडा लावत दुसऱ्याच दिवशी एका आरोपीला अटक केली होती त्यानंतर ठाणेदार प्रताप भोस यांची बदली झाली मात्र दुसरा आरोपी फरार होता त्यानंतर आता तीन महिन्यानंतर दुसऱ्या आरोपीला काही महिन्यापूर्वी नव्याने रुजू झालेल्या ठाणेदार सुजाता बनसोड यांनी अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव राजू अर्जुन जाधव वय ३४ वर्ष राहणार खडकी ता हिमायतनगर जिल्हा नांदेड याला कलम ३४१,३९४ नुसार खडकी येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनात बिटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड, पोलीस उपनिरीक्षक टीपुरने, जमादार मोहन चाटे, गजानन खरात, निलेश भालेराव, दत्ता कुसराम, मुंडे यांनी केली आहे.