स्वतंत्र विदर्भ राज्य मागणी करीता राष्ट्रीय महामार्ग बोरी इचोड येथे रस्ता रोको व जेलभरो आंदोलन संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

विदर्भ राज्य आंदोलन समिती ने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करा.कोरोना काळातील विजय बिल सरकारने भरावे,200 युनीट विज फ्रि करा नंतरचे युनिट दर निम्मे करा, कृषी पंपाचे विज बिल माफ करा,विज कनेक्शन कापणे बंद करा.पेट्रोल-डिझेल गॅस ची दरवाढ त्वरीत मागे घ्या या मागणी करीता आज दि 26अॉगस्ट रोजी गुरुवारला राळेगाव तालुक्यातील बोरी इचोड येथे महामार्गावर रास्ता रोको तसेच जेल भरो आंदोलन केले असून राळेगाव तालुका विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने बोरी ( ई) येथे आज गुरुवार दि.26अॉगस्ट ला.दु 12 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले,या आंदोलनाला वडकीचे ठाणेदार विनायकरावजी जाधव यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता
ह्यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रभाऊ झोटींग, होमदेवजी कन्नाके राळेगाव विधानसभा प्रमुख, तालुका अध्यक्ष गोपालभाऊ भोयर,ईदरचंदबाबु बैद,अक्षयभाऊ महाजन, नारायणराव बोरकर, विक्रमजी फटिंग, गजाननराव ठाकरे,सौ दिक्षाताई नगराळे,सुमनबाई काळे,जयश्रीताई तांमगडगे,संगीताताई बचाटे,गजाननराव ठाकरे,गजाननराव पारखी,महेशभाऊ आवारी,सह अनेक जण उपस्थित होते.