
राळेगाव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर
जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला दिवसा किमान 12 तास ओनितासाठी वीज उपलब्ध व्हावी अशी शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे.
रब्बी हंगाम सुरू झाला असून हरभरा व गहू या पिकांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र दिवसभर काबाडकष्ट करून राबणाऱ्या शेतकऱ्याला रब्बी हंगामात हरभरा व गहू पेरणी केल्यानंतर या पिकांना देण्यात येणाऱ्या पाण्यासाठी दिवसा थ्री फेज लाईन उपलब्ध नसल्याने दिवसभर शेतात राब राब राबणाऱ्या शेतकरी बांधवास ओलित करण्यासाठी रात्री शेतात जाऊन ओलीत करावे लागतात. त्यामुळे दिवसभर शेतात राबणे व रात्री बे रात्री ओळीत करणे यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
रात्री ओलीत करतानी अंधारात ओलीत करीत असताना साप विंचू यासारख्या विषारी प्राण्यापासून शेतकऱ्यांच्या जीवास धोका संभवतो. कधी काय होईल याची शाश्वती नाही . त्यामुळे जसे उद्योगधंद्यासाठी नेहमी वीज उपलब्ध असते तशी जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांसाठी दिवसा किमान बारा तास विज का उपलब्ध होत नाही? जर शेतकऱ्यांनी पिकविलेच नाही तर कसे होणार? हे एक न उलगडणारे कोडे आहे!
तेव्हा आता हरभरा व गहू या पिकांचा हंगाम सुरू झाला असून कडाक्याची थंडीही सुरू झाली आहे. तेव्हा थंडीत व अंधारात बळीराजासाठी थोडीफार कृपादृष्टी दाखवून लोकप्रतिनिधी व शासनाने दिवसा किमान 12 तास थ्री फेज लाईट उपलब्ध करून द्यावी अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे.
