
सहसंपादक :;रामभाऊ भोयर
कृषी उत्पन्न बाजार समितीत दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोज गुरुवार पासून सीसीआयच्या कापूस खरेदीला सूरवात होणार आहे
तरी ज्या शेतकऱ्यांना आपला कापूस सीसीआय केंद्रावर विक्रीकरिता आणायचा आहे अशा शेतकऱ्यानी कपास किसान ॲप द्वारे स्लॉट बुकिंग करूनच आपला कापूस विक्रीकरिता आणावा असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन करायचे आहे अशा शेतकऱ्यांनी कपास किसान ॲपद्वारे रजिस्ट्रेशन करतेवेळी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत डिजिटल सातबारा उतारा २०२५/२६, शेतकऱ्यांचे आधार कार्ड ,पासपोर्ट असणे बंधनकारक आहे तसेच
ज्या शेतकऱ्यांना कापूस विक्री करायचा आहे अशा शेतकऱ्यांनी कपास किसान अॅप द्वारे रजिस्ट्रेशन करतेवेळी किंवा स्लॉट बुकिंग करतेवेळी काही अडचणी आल्यास बाजार समितीचे राळेगाव, वाढोणा बाजार ,खैरी,केंद्रावरील किंवा सीसीआयचे अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा.
सीसीआय ने कापूस विक्री करतेवेळी दिलेल्या खालील अटी व शर्तीचे पालन करावे
(१) कापसाची आद्रता ८ % टक्के ते १२ % टक्के पर्यंत असावी
(२) कापसामध्ये कवडी, फडतल काळपट कापूस स्वीकारल्या जाणार नाही
(३)पावसाने भिजलेला कापूस स्वीकारल्या जाणार नाही
(४) पाणी मारून आणलेला कापूस स्वीकारल्या जाणार नाही
(५) ॲपद्वारे स्लॉट बुकिंग केल्यानंतर आपल्या पेरव्यानुसार कापूस विक्री करण्याची मर्यादा ठरवलेली आहे त्याच प्रमाणात आपला कापूस विक्री करिता आणावा वरील दिलेल्या सर्व अटीचे शेतकऱ्यांनी पालन करावे
श्री राजकुमार बैरवा
सीसीआय केंद्रप्रमुख राळेगाव
