
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ वरून वडकी कडे भरधाव वेगात जाणाऱ्या दसचक्की ट्रकची मेटिखेडा रोड राळेगाव येथे शिवाजी पुतळ्या जवळ दुचाकीला धडक बसल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना दिं २४ एप्रिल २०२४ बुधवारला सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की राळेगांव येथील संजय शंकर पोटफोडे वय ४५ वर्ष रा.नवीन वस्ती राळेगाव हा दुचाकी क्रमांक एम एच २९ ए एच १२८९ ने बाहेरून घरी जात असताना यवतमाळ कडून भरधाव वेगात येणाऱ्या एम एच ४० ए क्यू ८३५५ क्रमांकाच्या दस चक्कीट्रकने मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार संजय पोटफोडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार गोपाल वॉस्टर करीत आहे.
