गावठी दारूने घेतले एकच वर्षात पाच बळी गावात शोकाकुल वातावरन खुले आम विकली जाते दारू कारवाई होणार तरी कधी ग्रामस्थांचा प्रश्न

सहसंपादक: रामभाऊ भोयर

पवनार इथे गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक वार्डसह चोका चौकात खुले आम दारू विकली जात असून तरुण युवक याचे नाहक बळी पडत आहे याच विश्यारी गावठी ने एकाच वर्षात पाच तरुण युवकांना यम सदनी पाठवून आपल्या जाळ्यात ओढले यात महादेव मुंगले. महेंद्र पेटकर. मोशू वाटमोडे. विठल साटोने.
व आता प्रवीण उर्फ गबर धनविज यां तरुण युवकांना प्राण गमवावे लागले आहे या कडे पोलीस प्रशासन गांभीर्याने दखल कधी घेणार असा संतप्त प्रश्न गावकऱ्यांकडून विचारला जात आहे.
मागील मार्च 2023 रोजी पवनार येथील सर्व दारू विक्रेत्यांना बोलावून ग्रामपंचायत भवन इथे सेवाग्राम ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनीत घागे यांनी गावातील दारू विक्रेत्याची सभा घेवून गावात होत असलेली दारू विक्री त्वरित बंद करावी अन्यथा कठोर कारवाई करण्याची सक्त ताकीद दिली इतकेच नव्हे तर दारू विक्री होत असल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती देण्यात यावी माहिती दाराचे नाव गोपनीय ठेवून दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले असता काही महिने दारू बंद झाली होती मात्र निवडूक संपताच दारू विक्रेत्यांनी आपले डोके वर काढले असून भोई पुरा मातंग पुरा बौध्द पुरा बाजार चौक व वॉर्ड क्रमांक 3 इथे खुले आम दारू विक्री होत आहे.
या मुळे गावातील अनेक तरुण युवक दारूच्या विळख्यात जात आहे त्या मुळे परिवारातील कलह मोठ्या प्रमाणात वाढत असून दारू मुळे चौकात दादागिरी वाढत चाललेली आहे बाजार चौकात जिल्हा परिषदेची शाळा आहे मात्र याच चौकात यथेच्छ मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू सह गावठी दारूची सुधा मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचं उघड्या डोळ्यांनी नागरिकांना दिसत आहे मग पोलीस प्रशासनास का दिसत नाही.
बाजार चौकातून अवाजवी करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींना खाली मान घालून भीतीच्या वातावरणातून रोज आवागमन करावे लागत आहे.
शाळेच्या परिसरातच अवैद्य धंदे करू नये असे शासनाचे आदेश आहे मात्र हे आदेश केवळ कागदोपत्री असल्याचं दिसून येतं आहे.
नशेसाठीगावठी दारूत मिसळली जाते रींगोजन व कीटकनाशक औषधी
गावठी दारूची मोठ्या प्रमाणात नश्या येण्यासाठी खाजेवर उपचार करणारे रींगोझन तसेच फवारणी साठी वापरत असलेले कीटकनाशक औषधीचा वापर होत असल्याचं काही जाणकारांकडून सांगण्यात येत आहे त्या मुळे जास्त प्रमाणात नशा होऊन त्याचा विपरीत परिणाम लिव्हर व किडणींवर होऊन शरीरावर सुजण येवून शरीर हळू हळू निकामी होत असल्याच देखील काही जाणकार सांगतात
.

*विक्रेते करतात पैसे देत असल्याची बतावणी*
पोलीस प्रशासना कडून अनेकदा छापेमारी होत आहे मात्र पोलीस परत जाताच चोरट्या मार्गाने दारू विक्री होतच असल्याने पोलीस अधीक्षक यांनी कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थ बोलून दाखवत आहे तर दुसरी कडे पोलिसांना आम्ही पैसे देतो त्या मुळे आमच्यावर कोण कारवाई करणार कुणाला सांगायचे ते सांगा अश्या खुले आम धमक्या दारू विक्रेत्यान कडून काही नागरिकांसह पत्रकारांना  दिल्या जात आहे.
     त्या मुळे दारू विक्रेत्यांना कायद्याचा धाकचं उरला नसल्याचे देखील दिसून येत असून यावर अंकुश कधी लागणार पोलीस प्रशासन कडक कारवाई करणार का या कडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.