घुबडहेटी (वरध) पिण्याचे पाण्याकरीता पंचायत समिती येथील महिलांच्या ठिय्या आंदोलनाला यश

सहसंपादक : रामभाऊ भोयर

घुबडहेटी (वरध) हे छोटेसे अंदाजे 160 लोकसंख्येचे प स राळेगाव पासून 30 कीमी अंतरावरील गाव, कित्येक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या दरवर्षी शसना कडून थातुर- मातुर व्यवस्था करुन गावकऱ्यांना समजावून दिल्या जात, त्यामुळे महिलांना 2ते 3 किमी पाण्या करीता पायपीट करावी लागत होती, शासनाने या गावचा मागील वर्षी रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी 10 वर्षा करीता एकशन प्लॅन बनविला परंतू कामाला सुरुवात झालीच नाही, गावातील युवकांनी ग्रा प वरध इथे जावून पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली परंतू ग्राम पंचायत ने या समसेकडे गांभीर्याने कधी बघितलेच नाही अखेर महिलांनी एकत्र येऊन दि 27मार्च ला प स कार्यालयात येऊन गट विकास अधिकारी केशव पवार यांना निवेदन देवून पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली व ठोस आश्वासन मिळे पर्यंत प स मध्ये ठिया आंदोलन केले, पिण्याचे पाणी मिळणार नसेल तर आम्ही सर्व गावकरी मतदानावर बहिष्कार टाकनार असल्याने सांगितले,
याचा परिणाम दुसऱ्याच दिवशी गावा जवळील तलावात जेसिबी द्वारा नविन विहिरीचे खोदकामसुरू करण्यात आले. व अवघ्या 10फुटावर विहिरीला पाणी लागले या सर्व संघर्षातून आता आम्हाला पाणी मिळेल या आनंदात पुरुष व महिला नी मिळुन नवीन पाण्याचे पूजन केले, तहानलेल्या गावातील महिलांनी पुढाकार घेऊन दिलेल्या झुंजीला आलेले यश.