सर्वोदय विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक श्री टी झेड माथनकर यांनी ध्वजारोहण केले. सूत्रसंचलन श्री व्हि एन लोडे यांनी तर आभारप्रदर्शन श्री पि पि आसुटकर यानी केले. याप्रसंगी मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांची भाषणे झाली. याप्रसंगी गावातील नागरिक आणि विद्यार्थी तथा कर्मचारी बी बी कामडी व्हि टी दूमोरे एस एम बावणे एस वाय भोयर उपस्थित होते. या अगोदर वाविध क्रीडा स्पर्धा रांगोळी उखाणे संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला होता. सदर कार्यक्रमाचा लाभ गावातील सर्व नागरिकांनी बहुसंख्येने घेतला. आनंद मेळावा हे सर्व कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते.