वरूड जहांगीर येथील बैलाच्या शिकारीनंतर अजूनही वाघाचा मुक्काम त्याच परिसरात, वनविभाग करतं तरी काय?

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यात बऱ्याच दिवसांपासून एका वाघाने दहशत निर्माण केली असून त्या वाघाने अंतरगाव येथील एका शेतकऱ्यांची गाय जखमी केली आणि तेथून वाघोबाने आपला मोर्चा झाडगाव परिसराकडे वळविला आणि झरगड येथील गावालगत व लोणी रोडला लागून असलेल्या गोठ्यातील बैलाची शिकार केली आणि त्यानंतर वाघोबानी त्याच मार्गाने वरूड जहांगीर तलावापासून जंगलाला लागून असलेल्या बुकई शिवारात आपलं बस्तान बसविले.आणि दिनांक 24/8/2024 शेतातील विजय उत्तम राठोड यांच्या गोठ्यातील बैलावर हल्ला करून शिकार करून आपली भुक भागवली.त्यानंतर हा वाघ पुढच्या प्रवासाला सुरुवात करेल असे त्या शिवारातील शेतकऱ्यांना वाटत असतानाच अजूनही त्या वाघाचे दर्शन बुकई शिवारात मारलेल्या बैलाच्या परिसरातच होत असून आज दिनांक 27/8/2024 रोजी त्याच परिसरात शेतकऱ्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अनेक लोकांनी काही अंतरावरुन वाघाला पाहिले असून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाघाच्या बाबतीत चर्चा केली ती एक मादी जातीचा वाघ असल्याने त्या वाघावर आम्हाला कुठल्याही प्रकारचा पकडण्यासाठी प्रयोग करण्याचे आदेश नसून ते फक्त शेतकऱ्यांचे फोन येत असल्याने शेतकऱ्यांचे समाधान करत असल्याचे दिसून येते.आज दिनांक 27/8/2024 रोजी डोमा देविदास जाधव यांच्या शेतात वनविभागाचे वनपाल देवकते आणि वनरक्षक लोखंडे यांच्या सह गावातील तरुणांनी वाघ बघितला.या दहशतीमुळे शेतकऱ्यांनी शेतात जाणे सोडले असून अगोदरच अति पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता कुठे थोडा दिलासा मिळाला होता अशातच या वाघाने शेतकऱ्यांचे जगणे कठीण केले असून बैलाची शिकार केल्यानंतर वनविभाग जरी बैलाचा मोबदला देत असेल तरी बैल गेल्यावर वेळेवर झालेली धावपळ ही मात्र निश्चितच भरून निघत नसून ही वाघीण असून ती प्रेग्नंट असल्याने सध्या तरी शेतकऱ्यांना आपल्या जिवाची जबाबदारी स्वतः घ्यावी लागणार असून या प्रकरणी लोकप्रतिनिधी लक्ष देणार का हा प्रश्न निर्माण होत आहे.या बाबतीत राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राचार्य डॉ अशोक ऊईके यांनी पांढरकवडा येथील वनविभागाच्या मिटींगमध्ये प्रश्न निर्माण केल्याचे समजले असून बघू या कठीण प्रसंगातून शेतकरी व शेतमजूरांना कोण बाहेर काढून धीर देतात याकडे वरूड जहांगीर येथील रहिवासी शेतकरी व शेतमजूर बंधू भगिनींचे लक्ष लागले आहे.