धक्कादायक: ग्रामपंचायत मुळावा मध्ये घरकुल विषयी घोटाळा , ग्रामपंचायत सदस्याचा आरोप


लोकहीत महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप जाधव


उमरखेड तालुक्यामधील मुळावा गाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसेवक श्री धम्मपाल आडागळे आणि सरपंच श्री रामराव दामकर यांचा घरकुल विषयी फार मोठा घोटाळा आहे, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य विजयश्री गुळापाध्ये यांनी माहिती दिली. आणि आठ महिला सदस्या व सात पुरुष सदस्य असलेली ग्रामपंचायत मुळावा येथे सरपंचाची व ग्रामसेवक ची मनमानी कारभार मागील वर्ष 20 21_22 मध्ये गोरगरिबांची घरकुल फाईल तयार करून घेतली. आणि ग्रामपंचायत कडून घरकुल चे टार्गेट आले असून सुद्धा लाभार्थी यास जाणीवपूर्वक लाभ दिले नाही. त्याचबरोबर 15 वित्त आयोग आणि इतर आयोजनातून मोठा भ्रष्टाचार केल्यांचे आरोप सदर आयोगाच्या कामाची माहिती मागितली असता पूर्वीची उत्तरे देत असतात जास्तच विचारणा केली असता ग्रामपंचायत सरपंच व सचिव हे सदर मासिक सेवेत प्रोसिडिंग रजिस्टर वर प्रोसिडिंग न लिहिता एका कोऱ्या पेजवर लिहीत असतात व मला फरक पडत नाही तुम्हाला सह्या करायच्या असतील तर करा अशी उत्तरे देत असतात. तेव्हा माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती उमरखेड यांना आदराने विनंती केली की ग्रामपंचायत मुळावा येथील सरपंच व सचिव हे एका महिला सदस्यांचे हक्कावर अधिकार हिरावून घेत असल्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी समितीद्वारे करावी अन्यथा आम्ही ग्रामपंचायत मेळावे सुरू करू व सचिव आणि सरपंचाला खुला आळा घालावा अशी मागणी केली.