
सहसंपादक : रामभाऊ भोयर
विरुद्ध दिशेने भरधाव ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीचालक तर मागे बसलेला इसम दूर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला.ही घटना आज मंगळवार दि २२ ऑक्टोंबर रोजी दुपारी दोनच्या दरम्यान किन्ही जवादे फाट्यासमोर घडली.
सुरेश पवार वय ४५ वर्षे रा. दहेगाव,निळकंठ सिडाम वय ५५ रा.किन्ही जवादे असे अपघातात जखमी झालेल्या दोन्ही इसमाचा नावे आहे.
दहेगाव येथील सुरेश पवार व नीलकंठ सिडाम हे दोघे दुचाकी क्र एम एच २९ ए यु ३५१७ ने वडकी वरून दहेगावच्या दिशेने जात होते.दरम्यान नॅशनल हायवे क्र ४४ वरील किन्ही जवादे फाट्यासमोर भरधाव विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्र ए पी ०३ टी ई ४५९९ ला जबर धडक दिली.यामध्ये दुचाकी चालक सुरेश पवार याचे डोक्याला छातीला व पायाला गंभीर इजा झाली.तर नीलकंठ सिडाम याचे डोक्याला गंभीर मार लागला व पायाचा लचका पडून पायाची बोट रस्त्यावर पडून होती.अपघातातील
जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी करंजी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.यावेळी घटनास्थळी करंजी हायवे महामार्ग पोलीस व वडकी पोलीस तात्काळ दाखल होऊन महामार्गाची वाहतूक सुळळीत केली असून अधिक तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे.
डायव्हरशन नसल्यामुळे नागरिकांना जिव मुठ्ठीत घेऊन करावा लागतो विरुद्ध दिशेने प्रवास
राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वर वसलेल्या किन्ही जवादे सह नऊ गावातील हजारो नागरीकांना किन्ही फाट्यावर डायव्हरशन नसल्यामुळे जिव मुठीत घेऊन २ कि मी विरुद्ध दिशेने दररोज प्रवास करावा लागतो या विरद्ध दिशेच्या प्रवासामुळे अनेक अपघात होऊन अनेकांचे निष्पाप बळी गेले असुन नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्याना वारंवार डायव्हरशनची मांगणी करून सुद्धा डायव्हरशन मिळाले नाही.
दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील दोन्ही महामार्गावर वडकी ते दहेगाव दरम्यान अनेक पेट्रोल पंप आहे त्यामुळे काही ट्रक चालक व दुचाकी चालक विरुद्ध दिशेने प्रवास करीत या पंपावर पेट्रोल डिझेल टाकण्याकरिता जातात व येतांना विरुद्ध दिशेने येतात त्यामुळे महामार्गावर अपघाताची संख्या वाढली आहे.काही पेट्रोल पंपा समोर महामार्गानी डायव्हरशन दिले नसल्याने अनेकांनी महामार्ग फोडून कट पॉईंट तयार केले आहे.किन्ही गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर अनेक ट्रक चालक डिझेल भरण्याकरिता विरुद्ध दिशेने येतात त्यामुळेच अपघात घडतात. अश्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनावर महामार्ग पोलिसांनी कडक कारवाई करावी जेणेकरून अपघात घडणार नाही.
