
वरोरा शहरातील आंबेडकर चौक वरोरा यांच्या घरच्या स्लॅब वर काही लाकडे ठेवली होती.त्या लाकडांची अचानक पेट घेतला .धूर बाहेर पडत होता रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंग ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्याने गाढ झोपेत असणाऱ्या शेख मुन्नार शेख चांद राह व घरातील सदस्यांना उठविले व वेळेत आगीवर नियंत्रण मिळविले. त्यात पोलीस अंमलदार कपिल भंडारवार,मोहन निषाद व चालक रंगराव पाटील मेजर यांनी उत्तमरीत्या जबाबदारी पार पाडत दुर्घटना होण्यापासून वाचविले .
