
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव पोलीस टेशन अंतर्गत येत असलेल्या शेळी माढ येथील युवक महेश अंकुशराव मस्कर ३३ या युवकाने राळेगाव येथील माऊली पार्क मधील नविन घरामध्ये दिनांक १३ मे रोजी घरचे बाहेर गेले असता रात्री ९ वाजता घरात किटकनाशक घेतले घरच्या मंडळींना समजताच राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयत हलविण्यात आले तबेत जास्त असल्याने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयमध्ये नेत असता मडकोना जवळ मृत्यू झाला त्याने राळेगाव येथील माऊली पार्क मध्ये नविन घर बांधकामा करीता बेरार फायनान्स कडुन तीन लाख पन्नास हजार रूपये कर्ज घेतले असल्याचे समजते फायनान्स कपंनी चे काही हप्ते थकले असल्याने पत्नीला सांगत होता फायनान्स कपंनी कडुन रोज हप्ते भरा असे फोन येत असल्याने कर्जाला कंटाळून विष घेतल्याचे समजते त्याच्यामागे पत्नी भाऊ असा परीवार आहे त्याच्यावर शेळी माढ येथे दिनांक १४ मे रोजी हिंदू स्मशान भूमीत अंतीम संस्कार करण्यात आले अधीक तपास राळेगाव पोलीस स्टेशन चे निरीक्षक सिताराम मेहत्रे करीत आहे
