
ढाणकी शहरात १४ जानेवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह चालू असून यावेळी नामवंत कीर्तनकाराची कीर्तने श्रोत्यांना ऐकावयास मिळत आहे. यामध्ये कीर्तन रुपी तिसऱ्या दिवशी चे पुष्प गोवताना ह भ प तळणीकर महाराज यांनी आयुष्याची सार्थकता कशामध्ये आहे याची अनेक उदाहरणे देऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
जग कितीही आधुनिकते कडे चालले असेल तरी तरुणांमध्ये सुद्धा परमेश्वराचा ओढा कायम दिसतो. कीर्तन ऐकण्यासाठी अनेक तरुण मंडळी व महिला मंडळी यांची सर्वांची उपस्थिती होती. यावेळी महाराज म्हणाले माणूस भौतिक सुखात रमला असेल तरी पृथ्वीवरील स्टेशन रुपी थांब्यावर एक ना एक दिवस थांबायचे असून कोणत्याही प्रकारचे धनद्रव्य सोबत येत नाही त्यामुळे कपटी स्वार्थी वृत्ती सोडून जीवनात मोक्ष प्राप्ती करावी तसेच आजकाल आपण बघतोच आहे वडिलोपार्जित धन, द्रव्या साठी भावा भावामध्ये वाद विवाद होतात व ते न्यायालयापर्यंत सुद्धा जातात हे समाजासाठी हानिकारकच आहे. भावाविषयीची निष्ठा ही श्रीराम प्रभू कडे बघून शिकण्यासारखी आहे ज्यावेळी प्रभू रामचंद्र हे आईच्या आज्ञेला शिरोधार्य मानून वनवासात गेल्यानंतर श्री भरत राजाने राज्य सांभाळल श्री रामाच्या पादुका ठेवून त्यामुळे भावा प्रती निष्ठा काय असते हे भ रत राजा कडे बघून शिकण्यासारखे आहे व येणाऱ्या अनेक काळासाठी हे उत्तम उदाहरण होय तसेच जीवन जगत असताना धनद्रव्याची गरज जरूर असते पण आपल्या ऐपतीप्रमाणे आयुष्यात दानधर्म सुद्धा करायला पाहिजे. विहिरीला भरपूर पाणी असते आणि त्याचा जर योग्य उपभोग होत नसेल तर ते पाणी सुद्धा काही दिवसांनी निरुपयोगी बनते तसेच धनाचे व द्रव्याचे सुद्धा आहे दान हे झालं पाहिजे तर मग ते धार्मिक कार्यात असो किंवा समाजातील गरजू लोकांना मदत स्वरूपात असेल आपल्याला जे शक्य होईल अशा प्रकारचे दान करायला पाहिजे आयुष्यात मोक्ष प्राप्ती करायची असल्या परमेश्वराच्या भक्तीशिवाय मार्ग नाही त्यामुळे स्त्री, पुरुष, सगळ्यांना परमेश्वराची भक्ती करण्याचा अधिकार आहे भक्तिन मनुषातील हेवा दावा दुर्गुण नाहीसे होतो. तसेच भक्तीन प्रत्येक जीवांत परमेश्वर दिसतो. भक्तितीनेच प्रत्येकाला मोक्ष मिळवता येतो असे यावेळेस तळणीकर महाराज म्हणाले तर ज्ञानमंडपात कीर्तन ऐकण्यासाठी असंख्य ्य भक्ती समुदाय ओसंडला होता.
