खडकी येथील अतिक्रमण हटविण्यासाठी बसलेल्या महिलेचे उपोषण सुटले

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील खडकी ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसलेल्या महिलेचे उपोषण सुटले सविस्तर वृत्त असे गावातील नलुबाई लखमाजी कुमरे ही महिला गावातील एका इसमाने मोक्याच्या जागेवर अतिक्रमण केले ते अतिक्रमण ग्रामपंचायत ने त्वरित हटविण्यात यावे याकरिता उपोषणाला २६ जानेवारी रोजी खडकी ग्रामपंचायत समोर बसली होती सदर
मायाबाई नागोजी धोत्रे रा खडकी यांनी गावातील मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमण केले आहे सदर हे अतिक्रमण गावातील संबंधितांनी जाणीवपूर्वक शासनाचे कोणताही अधिकार नसतांना जागेचा वाटप करून मायाबाई नागोजी धोत्रे यांच्या नावाने ३२०० स्के.फुट चा प्लॉट केल्याबाबत उपोषण सुरू केले होते
तसेच संबंधितावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक २६ ‘जानेवारी, २०२३ पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसली होती
सदर खडकी येथिल तांडा वस्ती वार्ड क्र. १ येथे अनेक धर्माचे लोक त्या वस्तीत वास्तव्य करितात.वार्ड क्र १ येथील तांडा वस्तीमध्ये समाजाचे कार्य करण्यासाठी नियोजित जागा आखण्यात आली होती परंतू गावातील काही संबंधितांनी. राजकारण पुढे आणून ही जागा जाणीवपूर्वक धोत्रे यांना देण्यात आली होती सदर जागा ही या अगोदर वाटप करण्यात आलेल्या लोकांना देण्याचे आश्वासन संबंधित अधिकारी यांनी दिले होते. परंतु राजकीय हेतूपुरस्सर असल्याने संबंधित जागा मायाबाई नागोजी धोत्रे यांना देण्यात आली आहे.
सदर जागा ही शासनाची असून यामध्ये मायाबाई धोत्रे ही गावातील रहिवासी नाही. सदर काही दिवसापूर्वी या गावांत मोलमजुरी करण्यासाठी आले होते तरीही तिला राहण्यापुरती जागा देण्यास उपोषण कर्त्या महिलेची काही हरकत नाही. परंतु गावातील काही लोकांनी त्यांना जाणीवपुर्वक अधिकाराचा दुरुपायोग करून ३२०० स्के. फुट जागा एका विधवा बाईला कोण्या कारणाने देण्यात आली ? याची योग्य चौकशी होणे आवश्यक आहे. या मागणीसाठी नलुबाई लखमाजी कुमरे व तांडा वस्तीतील काही सहया करणारे लोकं दिनांक २६ जानेवारी २०२३ पासुन ग्रामपंचायत खडकी येथे आमरण उपोषणास बसले होती सदर वरिष्ठांनी योग्य ती चौकशी करून न्याय देण्यात यावा अशी मागणी उपोषण करत्या नलुबाई लखमाजी कुंमरे यांनी केली होती याची दखल घेत वरील उपोषण करत्या महिलेची मागणी मंजूर करून उपोषण सोडण्यात आले आहे सदर उपोषण सोडते वेळी सरपंच सौ.रंजना विजय नहाते, उपसरपंच राजु झोटिंग, विस्तार अधिकारी मस्के, सचिव राजेश ढगे, बंटी तेलतुंबडे, हेमंत वाबिटकर,अक्षय आत्राम,रवी उरवते अजय पढाल, प्रमोद कुमरे, आकाश पढाल , कैलास आत्राम, देवू काळे, राजु खोंडे,प्रमोद नहाते यांच्या उपस्थितीत नलुबाई लखमाजी कमरे यांचे उपोषण लिंबू पाणी देऊन सोडण्यात आले आहे.