विजयाची हॅटट्रिक केलेले प्राचार्य झालेत कॅबिनेट मंत्री

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव विधानसभा मतदारसंघातून तिनदा निर्वाचित झालेले, विजयाची हॅटट्रिक करणारे भाजपा चे विद्यमान आमदार प्रा. डॉ अशोक उईके यांनी आज दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री म्हणून विदर्भातील नागपूर येथे शपथ घेतली. त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने मतदार संघात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला.

दुसऱ्या टर्म मध्ये शेवटच्या शंभर दिवस कॅबिनेट मंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरांना संधी दिली होती.त्यावेळी त्यांनी पक्षबांधणी व विकास कामांकडे विशेष लक्ष दिले. मागील पाच वर्ष पक्षश्रेष्ठींनी दिलेलं उदिष्ट तर पूर्ण केले, त्या सोबतचं महायुती सरकार च्या सर्व योजना, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पणे प्रभावी पणे अंमलबजावणी योग्य रित्या केली. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी प्रा. डॉ. अशोक उईके यांच्यावर कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे मतदार संघाच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे