विमाशीच्या जिल्हा अधिवेशनाच्या निमित्ताने प्रांतिय अध्यक्ष अरविंद देशमुख यांचा राळेगाव येथे दौरा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने येत्या 17 मार्च रोज रविवारला बचत भवन सेलिब्रेशन हाॅल जुन्या सरकारी दवाखान्याजवळ मेडिकल चौक यवतमाळ येथे जिल्हा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्हि. यू. डायगव्हाणे माजी शिक्षक आमदार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ मुंबई हे राहणार असून उदघाटक सुधाकरराव अडबाले शिक्षक आमदार नागपूर विभाग उपस्थित राहणार असून प्रमुख उपस्थिती पदवीधर आमदार धिरज लिंगाडे,प्रांताध्यक्ष अरविंद देशमुख माजी प्रांताध्यक्ष श्रावण बरडे सर माजी विभागीय कार्यवाह मुरलीधर धनरे उपाध्यक्ष जयदीप सोनखासकर उपाध्यक्ष विजय ठोकळ विभागीय कार्यवाह बाळासाहेब गोटे यांची राहणार असून या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोबतच विशेष अतिथीचा व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची नविन कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिनांक 1/3/2024 रोजी दुपारी राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भेट देऊन कार्यक्रमाची माहिती दिली.त्यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष अरविंद देशमुख यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी त्यांच्या सोबत माजी विभागीय कार्यवाह मुरलीधर धनरे,जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर , सहकार्यवाह आनंद मेश्राम सर, उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते सर हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार राळेगाव तालुका कार्यवाह गोपाल बुरले सर यांनी केले.या वेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.