दहेगाव येथील युवकांचा विज वाहिनीच्या स्पर्शाने मृत्यू,मारेगाव शहरातील घटना

सहसंपादक : रामभाऊ भोयर

मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये गवंडी काम करत असताना एका 30 वर्षीय कामगारांचा उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीशी स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची घटना आज दि.23 डिसेंबर रोज शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्रफुल्ल विठ्ठल तिवाडे(वय30रा. दहेगाव, ता राळेगाव) असे मृताचे नाव आहे. वीज कंपनीच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
वीज कंपनीच्या 33 केव्ही विद्युत दाबाच्या तारा लोंबकळलेल्या स्थितीत असून. या ठिकाणी शेख यांच्या घराचे बांधकाम काम करत असताना विद्युत तारेचा स्पर्श होताच विजेचा झटका बसल्याने प्रफुल्ल गतप्राण झाले. त्यांना तातडीने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत. प्रफुल्ल यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा आप्तपरिवार पाठीमागे आहे