
रेती अभावी बांधकामाचा प्रश्न बिकट बनला आहे, केंद्र व राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी घरकुल योजनेद्वारे घर मंजूर झाले मात्र बांधकामा करीता रेती उपलब्ध होत नसल्याने घराचे काम ठप्प पडले. या बाबत आदिवासी विकासमंत्री ना. प्रा. डॉ. अशोक उईके यांनी दि. 15 मार्च च्या, आढावा सभेत हा विषय घेतला. घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून दया असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. रेती अभावी गोर -गरिबांचे बांधकाम थांबता कामा नये, त्या करीता नियमानुकूल काय करायचे ते करा अशी तंबीच त्यांनी प्रशासनाला दिली.या सोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न,अतिक्रमण नियमानुकूल करणे आदि विषयावर देखील त्यांनी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
तहसील कार्यलय येथे शनिवारी दुपारी ना. प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभा घेण्यात आली.उप विभागीय अधिकारी, तहसीलदार यांचे सह अधिकारी सर्व विभागाचे कर्मचारीसभेला उपस्थित होते.शासनाने घरकुल लाभार्थ्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरीता निधी उपलब्ध करून दिला. राहते घर पडले आणि नवीन बांधकाम करीता रेती भेटत नाही, राहण्याची सोय नाही अशी बिकट स्थिती घरकुल लाभार्थी कुटुंबाची आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. शासन प्रत्येक समजघटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे, प्रशासनाने त्या दिशेने काम केलेच पाहिजे अशी सडेतोड भूमिका त्यांनी मांडली. शेतकरी, कष्टकरी, महिलां भगिनीं व सर्व समाज घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे प्रशासनाने ही कार्यक्षम असले पाहिजे. अशी जाणीव देखील त्यांनी करून दिली. घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याच्या महत्वाच्या विषय ना. प्रा. डॉ. अशोक उईके यांनी हाताळल्याने घरकुल लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होतांना दिसलें.या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजन कोल्हे, माजी सभापती प्रशांत तायडे, भाजपा शहर अध्यक्ष डॉ. कुणाल भोयर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष (AP) शशिकांत उर्फ बाळू धुमाळ, संतोष कोकुलवार आदि सह पदाधिकारी उपस्थित होते.
तहसील कार्यालय राळेगाव येथील या आढावा सभेला तहसीलदार अमित भोईटे, गशीअ केशव पवार, सीताराम मेहत्रे यांचे सह समंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
