
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील शिवाजी नगर
प्रभाग क्रमांक 13 मध्ये दि. १ मार्च ०२५ रोजी सकाळी ९ वा.
श्री श्याम लक्ष्मणराव परचाके यांच्या घराला आग लागून पूर्णपणे घर जळाले घरातले सगळे धान्य, कपडे ,भांडे, सर्वपणे नष्ट झाले.
मदतीचा हात म्हणून कुटुंबात धान्य कपडे घेण्याकरिता तात्काळ मदत ७००० रुपये करण्यात आली . त्या प्रभागातील
नगरसेविका अश्विनीताई प्रदीपराव लोहकरे,छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, राळेगाव,
राजू दुधपोळे, अंकित कटारीया, यांनी रोख रक्कम सात हजार रुपये मदत देण्यात आली.
यावेळी मंगेश राऊत नगरसेवक, प्रदिप लोहकरे माजी नगरसेवक,अंकित कटारीया संचालक कृ.उ.बा. राळेगाव, नितीन कोमेरवार,सैयद लियाकत अली,संजय दुरबुडे,मनोज पेंदोर, अंकुश वड्डे, तलाठी सौरभ तुमस्कर, अविनाश पेंदोर सह प्रभागातील नागरिक उपस्थित होते
