प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारताचे शूरवीर भगतसिंग व अब्दुल हमीद यांना आदरांजली अर्पण



७४ व्या प्रजासत्ताक दिनी शहिद ए आजम भगतसिंग व शहिद अब्दुल हमिद यांच्या प्रतिमेचे पुजन केले व सर्व देशात सर्वधर्म समभाव प्रस्थापित व्हावा अशी प्रार्थना करण्यात आली देशासाठी बलिदान काय असते हे शहीद अब्दुल हमीद यांनी आपल्या पराक्रमांमधून दाखवले तसेच आपल्या देशाप्रती भक्ती व श्रद्धा कशी असायला पाहिजे व एकनिष्ठ व प्रामाणिकता कशी असायला पाहिजे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारत मातेचे हे दोन विर होय त्यातील अब्दुल हमीद यांनी भारत पाकिस्तानच्या युद्धा वेळेस पाकिस्तानचे अत्याधुनिक रणगाडे आपल्या बुद्धी चातुर्याने यांने व पराक्रमाने मागे जाण्यास भाग पाडले व यामध्ये भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. नक्कीच युवकांना व नवतरुणांना एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून अब्दुल हमीद हे कायमच ध्यानात राहावे म्हणून प्रत्येक प्रजासत्ताक दिनाच्या वेळी भारताचे सुपुत्र अशी ज्यांची ओळख असलेले अब्दुल हमीद यांच्या प्रति शहरात आदरांजली अर्पण करण्यात येते तर ज्यांनी क्रांतीची ज्योत पेटवली व नव तरुणांना इंग्रजांविरुद्ध बंड करण्याचे शिकवले व केवळ मवाळ मतवादी होऊन स्वातंत्र्य लाभत नाही तर वेळप्रसंगी बंड पुकारल्याशिवाय होणारा अत्याचार थांबणार नाही हे सुद्धा भगतसिंग यांनी शिकवले आणि इथूनच अनेक तरुणांनी स्वातंत्र्याच्या या युद्धामध्ये आपली आहुती दिली. असे वीर पुत्र भगतसिंग यांच्या प्रतिमेला सुद्धा पुष्पहार अर्पण करण्यात आला.