मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा : तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे खोदकाम करायचे असतील त्यांनी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी मागणी अर्ज महाडीबीटी प्रणाली द्वारे ऑनलाईन पद्धतीने करून शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्याच्या लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी यांनी केले आहे
या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे इनलेट आउटलेट सह व इनलेट आउटलेट विरहित या दोन्ही घटकांकरिता अनुदान मिळणार आहे
या वैयक्तिक शेततळे खोदकामासाठी आकारमान निहाय रक्कम अनुदान ७५००० हजार रुपये पर्यंत मर्यादित आहे यामध्ये आउटलेट खोदाई व सिल्ट ट्रॅपसह शेततळे तसेच आउटलेट खोदाई व सिल्ट ट्रॅप विरहित शेततळे १५ बाय १५ मीटर व खोली ३ मिटर या करिता २०२३५ रुपये व जास्तीत जास्त ३४ बाय ३४ मीटर खोली ३ मीटर याकरिता ७५००० रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे त्या करिता अर्जदारकडे ०.६० हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे.तसेच शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी व ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी शेततळ्यांचा लाभ घेतलेला नसावा .ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायच आहे त्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जमिनीचा सातबारा आठ अ उतारा आधार कार्ड बँक पासबुक हमीपत्र जातीचा दाखला आदी कागदपत्रे घेऊन http://mahadbt.mahrashtra.gov.in या संकेतस्थळावर सीएससी केंद्रावरून जावून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा वैयक्तिक असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.