महसुलाचा हव्यास आणि स्वारस्य तरुण पिढीओढली जात आहे व्यसनाधीनते कडे


जिल्हा प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी


भारतीय संस्कृती ही इतर युरोपीय व आशिया खंडातील देशापेक्षा वेगळी आहे शिवाय जुन्या परंपरा रुढी यांचा येथील सर्वसामान्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात पगडा आहे. त्यामुळे संस्कृती राहणीमान दैनंदिन जीवन पद्धती ही नेहमीच युरोप खंडातील व इतर खंडातील लोकांना नेहमीच भारतीय संस्कृतीचे आकर्षण राहिली ही वस्तुस्थिती आहे. तसे बघता शहरी भागातील मद्यपान करणारी संस्कृती ग्रामीण भागात सुद्धा सक्रिय झाली आहे. मद्यपान हे आरोग्यासाठी अत्यंत घातक व विषारी आहे अशा जाहिराती विविध प्रकारे शासन दूरचित्रवाणीच्या माध्यमातून जनजागृती करत असते. काही धर्मामध्ये तर मद्यपान करणे हे महापाप समजले जाते व नैतिकतेला अनुसरून नाही असे मानणारी मंडळी एकेकाळी दारू विक्रेत्यांच्या दुकानासमोरून जाणे सुद्धा वर्ग समजायचे व यापासून दूर राहायचे समाज व्यसनाधीन तिकडे जात आहे म्हणून विविध धरणे आंदोलन करीत असत तरी पण समाजातील होत असलेली व्यसनाधीनता एकाकी पूर्णपणे उच्चाटन करणे शक्य नाही. आणि लागलेले व्यसन एकाएकी सुटणे अशक्य आहे. याचाच अनुभव सध्या व्यसनाधीन असलेल्या हजारो कुटुंबातील व्यक्तींना दांडगा आहे सर्वसाधारण व्यक्ती आपला चरितार्थ चालवून वाट्याला आलेले दुःख विसरण्यासाठी मदिरा प्राशन करतात तर आर्थिक व धनाढ्य व्यक्ती आपली मौजमजा व शान शौकत जपण्यासाठी क्लब, पब, मध्ये जाऊन मदिरा प्राशन करतात तसेच काही सणा निमित्य दुकानांना सुट्टी असते तेव्हा आपल्या व्यसनामध्ये खंडन पडू नये म्हणून साठा सुद्धा केला जातो. इतकी काळजी श्रम परिहार करणाऱ्या व्यसनाधीन जीविना असतो. तसेच मदिरा प्राशन न करणाऱ्या व्यक्तींना या चंदेरी दुनियेत अडाणी स्वरूपात बघितल्या जाते. लोकांना बियर, रम,या पेक्षा विस्की ने अधिक मोहपाशात बांधून ठेवले आहे २०२२ या वर्षात २१९ दशलक्ष बाटल्या रीचवणाऱ्या लोकांनी इतर देशाच्या तुलनेत आपल्या देशाने मागे टाकत प्रथम क्रमांक पटकाविल्याचे ऐकिवात आहे. ज्या भूमीमध्ये अनेक क्रांतिकारी संयमी मृदूभाषी थोर पुरुष होऊन गेले त्या ठिकाणी दारूबंदी अल्पायुषी ठरली. वर्धा जिल्हा हा महात्मा गांधीजी यांची कर्मभूमी समजली जाते. अशा पवित्र ठिकाणी सुद्धा दारूबंदी पुरेपूर होऊ शकली नाही. अर्थातच दारू पिणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली त्यामुळे तो प्रकृतीच्या नियम बनला मागणी जास्त किंमत सुद्धा वाढणारच देशांतर्गत राज्य सरकार दारूवर वारे माप कर लावून त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या महसुलामुळे सर्वसामान्याच्या आरोग्यापेक्षा महसुलात अधिक स्वारस्य दाखवीत आहे तसे बघता दैनंदिन गरजा भागवतांना व्यसनाधीन लोक जीवनावश्यक वस्तूवरील कमी अधिक काटकसर करीत आहेत.