
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
रावेरी येथील ग्रामपंचायतच्या कुरणलागून असलेल्या शेतात नथू किसन घुले वय वर्षे 70 राहणार परसोडी तालुका कळंब जिल्हा यवतमाळ यांनी आज रोजी पहाटेच्या सुमारास एका झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली, धनगर समाज हा आपल्या उदर निर्वाह करिता बाहेर गावी फिरत असतो आपल्या परिवार सोबत रावेरी येथे मेंढ्या घेवून आला असता आज सकाळी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे,त्याच्याकडे दोन एकर शेती असून तो किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याचे समजले या आजारापोटीच त्यांनी आत्महत्या केली असावा अशी शंका उपस्थित होत आहे त्याच्यामागे बराच आप्तपरिवार असून चार मुले दोन मुली आहे.
