रब्बी हंगामातील मुख्य पीक हरभरा बहरले असून येणारा काळच ठरवेल पिकाची उत्पादकता


प्रतिनिधी, प्रवीण जोशी
ढाणकी


सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे धुक आणि ढगाळ अशा वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकावर अळ्याचे प्रमाण दिसत आहे. बदलत्या हवामानामुळे नक्कीच हरभरा पिकावर अळीचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला असून अळी झाडाची पाने फुले या महत्त्वाच्या बाबीवर हल्ला करते त्यामुळे नक्कीच होणाऱ्या उत्पादनावर याचा गंभीर परिणाम होणार एवढे नक्की सध्या हरभरा हा घाट्यावर असून वातावरणात थोडाफार बदल झाला की लगेच किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो पेरणी केल्यापासून ते माल परिपक्व होऊन घरी येऊन थप्पी ला लागत नाही तो पर्यंत शेतकऱ्याच्या पिकविलेल्या मालाचे बेभरोसेच काम असते. तसे बघता हरभरा पीकास वातावरणातील बदलामुळे फवारणी करणे जरुरी समजले जाते कमीत कमी तीन फवारण्या करणे जरुरी असून असे न केल्यास उत्पन्नात घट होऊन आर्थिक फटका सुद्धा बसू शकतो
तसेच चिबाड जमिनीतील हरभरा पीक जरी घाट्यावर आले असताना सुद्धा सूकून जात असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करणे जरुरी बनले आहे पेरणी करत असताना हरभऱ्याच्या विविध प्रजाती आहेत त्या खरेदी करत असताना संबंधित बियाण्याच्या किमती अक्षरशः गगनाला भिडल्या पण शेतकऱ्याचा माल बाजारपेठेत आला म्हणजे तो पेरताना खरेदी केलेल्या किमतीपेक्षा कितीतरी कमी किमतीने विकून शेतकऱ्यांना समाधान मानावे लागले का हा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यासमोर यानिमित्ताने उभा ठाकतो हरभरा व गहू पीक काढणीला व कापणीला येईपर्यंत शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागणार तसेच रब्बी हंगामामध्ये पिकाचा विमा उतरविताना उदाशिनता दिसली तसे बघता उदासीन होणे सहाजिक पण आहे गेल्या अनेक वर्षापासून रब्बी पिकातील मुख्य पीक असलेल्या हरभरा व गहू पिकाला विम्याचे संरक्षणच भेटले पण शेतकऱ्याकडून प्रीमियम भरून घेतले पण विम्याचा लाभ मात्र होताना क्वचितच बघितला यावर शासनाने योग्य पावली उचलून व लोकप्रतिनिधींनी सुद्धा या संदर्भात दाद मागून शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना विमा मिळवून दिल्यास योग्य होईल सध्या तरी हिरव्या गर्द रंगांनी हरभरा व गहू पीक बहरले असून एकरी हेक्टरी किती माल होईल याचा अंदाज अनुमान काढणे जरा कठीणच म्हणावे लागेल तेव्हा शेतकऱ्याच्या पदरात जोपर्यंत मालाची रक्कम हाती येत नाही तोपर्यंत अनिश्चितता राहणार एवढे नक्की शेवटी निसर्ग राजा येणाऱ्या काळात आणखीन कोणते किती व कसे सोहळे दाखवतो हे पण तितकेच महत्त्वाचे.