
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील बरडगाव येथे स्थित मार्कंडेय ज्युनिअर कॉलेज चा १०० %निकाल लागला असून यंदाही कॉलेज च्या विद्यार्थ्यानी तालुक्यातून टॉपर येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. कु.तनिषा सतीश डाखोरे 89% गुण घेत तालुक्यातुन प्रथम आहे तर कु.जाणव्ही संजय दुरबुडे 81%, सक्षम संजय गोरंटीवार 80%, परीक्षित अशोक खेकडे 79%, कु.श्रद्धा प्रवीण एकोणकर 75%, कु.जाणव्ही संजय वाऱ्हेकर 72%, कु. श्रजल रवींद्र कोठारी 69%, समर्थ प्रदीप लोहकरे 64%, साक्षी गणेश ठाकरे 63%, उन्नती निलेश बोभाटे 63% गुण घेत प्रशंसनीय यश संपादन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत असून संस्थेच्या अध्यक्षा तथा प्राचार्या डॉ. शितल बल्लेवार व संस्थेचे सचिव डॉ. संतोष कोकुलवार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यानी यशाचे श्रेय शिक्षकांना तसेच पालकांना दिले.
