वडकी पोलिसांची अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर धडक कार्यवाही: दोन दिवसात दोन ट्रॅक्टर वर कारवाई

सहसंपादक: रामभाऊ भोयर

वडकी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चहांद इथे अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर जात असताना वडकी पोलीसानी त्या ट्रॅक्टरला थांबण्यास सांगितले असता तो पळून गेला व जाता जाता चालू ट्रॅक्टर मधूनच रेती खाली करत गेला असता अर्धा ट्रॅक्टर रेती खाली करून भरधाव वेगाने पळून गेला असता पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडल्यावर विचारणा केली असता सदर ट्रॅक्टर मध्ये असलेल्या रेतीचा परवाना नसल्याचे व सदर ट्रॅक्टर मधील वाळू चोरीची असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तेव्हा पोलिसांनी कार्यवाही करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. ट्रॅक्टर मुंडा व ट्रॉली क्रमांक एम . एच .२९ वाय.५९२० व एक ब्रास रेती किंमत४००० रुपये व ट्रॅक्टर किंमत अंदाजे तीन लाख रुपये असा एकूण तीन लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व आरोपी संदीप संभाजी देऊळकर वय३४ वर्ष राहणार मुदापूर यांचे वर कलम२७९,३७९ भादवी व सहकलम१८४ मोवाका , कलम४८ गुन्हा नोंद करण्यात आला. ही कार्यवाही वडकी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महाले यांच्या मार्गदर्शनात जमादार संदीप मडावी यांनी केली. दुसऱ्या घटनेत अवैधरित्या रेतीची मारेगाव तालुक्यातील कोसारा येथून रेतीची चोरून वाहतूक करणाऱ्यास रविवार 27 ऑगस्ट रोजी वडकी पोलीस स्टेशन हद्दीतील दहेगाव शिवारातून ताब्यात घेण्यात आले मालेगाव तालुक्यातील कोसारा वाळू डेपोतून प्रीतीची सर्रास चोरी सुरू आहे यासंदर्भात वडकी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी रेती चोरट्यावर पाळत ठेवीत दहेगाव येथे रंगेहात ताब्यात अंकुश किसन घुंगरूड रा. महादापेठ(कुंभा) तालुका मालेगाव असे येते की चोरटे वाहतूक करणाऱ्या इसमाचे नाव असून त्याच्याविरुद्ध वडकी पोलिसांनी भादवी ३७९ अनन्वये गुन्हा नोंदविला आहे. वडकी पोलिसांची अवैध रेती विरोधात ही सलग दुसरी कार्यवाही आहे. या कार्यवाही वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांचे मार्गदर्शनात वडकी पोलिसांनी पार पाडल्या.