कायदा अभ्यास वर्गाचे राळेगाव येथे दिवाणी तथा फौजदारी न्यायालय परिसरात आयोजन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

भारतीय कायदा जाणून घेण्याची उत्सुकता असलेल्या सर्व सामान्य व्यक्तीला नव्याने लागू करण्यात आलेल्या फौजदारी कायद्याची ओळख व समज व्हावी या हेतूने अधिवक्ता परिषद स्थापना दिनाच्या निमित्याने अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवक्ता परिषदेच्या वतीने येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय राळेगाव येथे २१ सप्टेंबर, शनिवारी दुपारी २ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अॅड. राकेश त्रिवेदी सरकारी वकील या अभ्यास वर्गात नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.

सर्व वकील बंधूभगिनी, पोलिस अधिकारी, कर्मचारी व नवीन कायद्याची उत्सुकता असलेल्या नागरिकांनी ह्या अभ्यास वर्गाला उपस्थित राहण्याचे आवाहन राळेगाव तालुका अधिवक्ता परिषदेचे अॅड. प्रितेश वर्मा, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रफुल्ल चौहान तथा सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.