
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक १७ व १८ रोजी नागपुर येथे संपन्न झाले, शासनाच्या उदासीन धोरणामुळे सरकारी व निमसरकारी शाळा बंद पडत आहे.त्यासाठी मोठ्या आंदोलनाची गरज आहे असे उद्गार व्यासपीठावरुन माजी आमदार ना.गो.गाणार यांनी काढले.जुण्या पेन्शन चा मुद्दा आता सुप्रीम कोर्टात आहे व ही लढाई आपण नक्कीच जिंकु असे ते पुढे म्हणाले.एकच मिशन,जुनी पेन्शन च्या घोषणेने वसंतराव देशपांडे सभागृह शिक्षकांनी दणाणून सोडले,या कार्यक्रमासाठी राज्य कार्यवाह राजकुमार बोनकिल्ले, जिल्हा कार्यवाह राजेश मदने, संतोष पवार, अमोल काटेकर, लक्ष्मण कानकाटे, सुधीर कानतोडे, प्रफुल्ल वराठे, श्रीकांत हेमके,व जिला सहसंयोजक राजेश शर्मा हजर होते।
