
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील अल्पभूधारक शेतकरी अनिल कीसनाजी गुरनुले या शेतकऱ्यांची बैलबंडी बेंबळा कालव्यामध्ये बुडून बैल बंडेला बांधून असलेल्या दोन जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली आहे सविस्तर वृत्त असे रिधोरा येथील अल्पभूधारक शेतकरी अनिल किसनराव गुरनुले हा शेतकरी नेहमीप्रमाणे आपली बैलबंडी घेऊन व त्याला एक गाय व गोरा बांधून आपल्या शेताकडे कापूस वेचणीसाठी जात असताना खैरगाव जवादे कडून पिंपळापूर कडे जाणाऱ्या बेंबळा कालव्याने जात असताना अचानक जंगली डुकरांचा कळप बैलबंडीला आडवा गेला व त्या जंगली डुकराला घाबरून बैलबंडी बेंबळा कालव्यामध्ये कोसळली असून यामध्ये दोन बैल व शेतकरी यांना बाहेर काढण्यात यश आले तर बैलबंडीला एक गाय व एक गोरा बांधून असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशन व संबंधित महसूल विभाग तसेच वन विभागांना देण्यात आली होती परंतु तीनही विभागाचे संबंधित अधिकारी १० नोव्हेंबर रोजी घटनास्थळी पोहोचले नसून सदर ११ नोव्हेंबर रोजी महसूल विभागातील मंडळ अधिकारी महादेव सानप तर तलाठी शिवानी वानखडे तसेच महसूल सेवक दिपक खीरडकर यांनी घटनास्थळी पोचून पंचनामा करून सदर पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या हाताने दोन्ही जनावरांचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. तर १० नोव्हेंबर रोजी वडकी पोलीस स्टेशनला तक्रार देऊन सुद्धा संबंधित बीड जमादारांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याने वडकी पोलिसांवर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असुन संबंधित विभागांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करून देण्यात यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे
