अत्यल्प मदत मिळालेल्या पिंपळापुर येथील शेतकऱ्यांची तहसिल कार्यालयावर धडक,सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर करा कारवाई


सरसकट मदत द्या


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


तालुक्यातील पिंपळापूर शिवारातील अतिवृष्टीने झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई मदत कोणतेही निकष व अटी शर्ती न लावता सरसकट हेक्टरी 13600 रुपये भरघोस मदत करून खोटा व अत्यल्प नुकसान दाखवणाऱ्या सर्व्हेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या वर्षातील खरीप हंगामातील पिकांचे सतत च्या पाऊसामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सतत पाऊस असल्यामुळे उगवलेले अंकुर सुद्धा जमीनदोस्त झाले. त्यामुळे गावातील संपूर्ण शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. व सतत पाऊस असल्यामूळे खरपणी व शेतीचे निगडीत संपूर्ण कामे हे पूर्ण करता आले नाही. खुरपणी, डवरणी वेळेवर न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची पाहीजे तेवढी वाढ झाली नाही. त्याचाच परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पनावर सुद्धा झालेला दिसतो. काहि शेतकऱ्यांच्या जमीनी पडित झाल्या. सर्वेक्षण अधिकारी यांनी हा सगळा विचार न करता बांधावर न येता नुकसान सर्वेक्षण टक्केवारी अत्यल्प जाहीर केली. तसेच व्यक्तिगतरित्या काहि लोकांना जास्त लाभ दिला व चालढकल मदत शेतकऱ्यांना देवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तरी ज्या शेतकऱ्यांचे तुटपुंजी मदत केली आहे. अश्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पुनच्छ सर्वेक्षण करून महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेली रक्कम हेक्टरी 13600 रुपये सरसकट मदत करावी. व संबंधीत सर्वेक्षण अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पिंपळापुर येथील सरपंच रविभाऊ चौधरी , किशोरभाऊ नहाते, विशाल कुळसंगे , निखिल बरडे, हर्शल नहाते, रुतिक कुरटकर , किशोर चौधरी , राजूभाऊ इंगोले , नरेंद्र भुजाडे.व समस्त पिंपळापूर शेतकरी यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.