

वाशीम – जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करण्यासह शेतकर्यांना हेक्टरी १.५० हजार अनुदान वितरीत करणे व इतर अनेक मागण्यांच्या पुर्ततेसाठी रविवार, १३ ऑगष्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा संपर्क नेते विठ्ठल भाऊ लोखंडकर जनहित च्या राज्य उपाध्यक्ष प्रा संगीता चव्हाण यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा नेण्यात आला. मोर्चाचे आयोजन तालुका संघटक रघुनाथ खुपसे यांनी केले.
जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकर्यांना हेक्टरी १.५० हजार अनुदान वितरित करा, वन्य प्राण्यांच्या हैदोसमुळे शेतकर्यांच्या पिकाचे झालेली नुकसान भरपाई त्वरित करा, वन्य प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करा, जिल्ह्यात एक लाख ८० हजार लाभार्थी पैकी एम किसान योजनेतील अंदाजे तीस हजार ५३१ लाभार्थी लाभापासून वंचित आहेत त्यांना तात्काळ लाभ द्या, जिल्ह्यात खताचा काळाबाजार करणार्या कृषी सेवा केंद्रांवर त्वरित कारवाई करा, शेतकर्यांना बोगस बियाणे, खते, औषधी, विकणार्या कृषी केंद्रावर, कंपनीवर त्वरित कारवाई करा, शेतकर्यांना वेळोवेळी करण्यात आलेली मदत शेतकर्यांच्या खात्यात जमा करा, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीसाठी जाहीर करण्यात आलेली मदत तात्काळ शेतकर्यांच्या खात्यात जमा करा आदी मागण्यांसाठी मोर्चाच्या माध्यमातून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
मोर्चाचा प्रारंभ पाटणी चौक येथे करण्यात आला. त्यानंतर अकोला नाका मागे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. तेथे जिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण मवाळ, तालुका संघटक रघुनाथ खूपसे, तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड, तालुका उपाध्यक्ष किशोर गजरे, आशिष काळे, शहर संघटक प्रतीक कांबळे, शहराध्यक्ष गणेश इंगोले, शहर उपाध्यक्ष राजेश भालेराव, विजय नाईकवाडे, विभाग अध्यक्ष दीपक काशीद, देवानंद खरे, तालुका संघटक महेश देशपांडे, मालेगाव तालुका अध्यक्ष गजानन कुटे, तालुका उपाध्यक्ष रामेश्वर वाघ, तालुका उपाध्यक्ष विनोद वानखडे, तालुका सचिव रितेश राठोड, तालुका कोषाध्यक्ष प्रमोद राठोड, शिरपूर शहराध्यक्ष सुनील देशमुख, मालेगाव शहर संघटक अतिष जैन, तालुका सचिव धनीराम बाजड, अशोक कराळे, शेतकरी सेना जिेल्हाध्यक्ष दिनेश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत, रिसोड तालुकाध्यक्ष वैभव वानखेडे, रिसोड वाहतूक सेनेचे विनोद सावके,गजानन जैताडे विद्यार्थी सेना युवा नेतृत्व मोहन कोल्हे, तालुकाध्यक्ष यश चव्हाण,देविदास जैताडे बेबी कोरडे अर्चना इंगळे,प्रमिला थोरात,पुष्पा रौदळे,कैलास रौदळे परशराम दंडे, गोपाल मोटे, मनोज इंगळे, योगीराज लाडवीकर, कडूबा गुडदे, विलास मुसळे, प्रल्हाद मुसळे, गजानन कड, समाधान बुंदे, गजानन लांडकर, गजानन खांबलकर, सुभाष लांडकर, विमल ठाकरे, हनुमान धाबे, भीमराव लांडकर, भास्कर कडणे, दामोदर भगत, शंकर खूपसे, महादेव लांडकर, नर्मदा लांडकर, विठ्ठल लांडकर, वसुदेव लांडकर, गणेश लांडकर, महादेव लांडकर, गजानन नवघरे, जीजेबा घुगे, रामभाऊ खांबलकर, संदीप घुगे, प्रभाकर लांडकर, विजय खांबलकर, विश्वनाथ बुंदे, विनायक लांडकर, सुनील लांडकर, नागोराव सुर्वे, सुभाष कड, नामदेव गायकवाड, रवी सावके, विठ्ठल जाधव, गजानन शिंदे, गणेश भालेराव, गणेश खांबलकर, गोविंद भगत, राजू खांबलकर, विनायक खांबलकर, हनुमान मोरे, देवानंद मोरे, विश्वनाथ इंगोले, गणेश लांडकर, प्रल्हाद सुर्वे, राजू खडसे, भास्कर सुर्वे, गौतम गायकवाड, प्रकाश गायकवाड, पार्वता डोंगरे, संतोष धाबे, रमेश भगत, नामदेव खूपसे, गजानन सुर्वे, मोहन भगत, बाळू भगत, सुभाष खांबलकर, हनुमान सावके, नर्मदा लांडकर, ज्योती इंगोले, प्रदीप गायकवाड, शंकर भगत, रामजी कांबळे, कैलास लांडकर, संजय सुर्वे, दत्ता लांडकर, महादेव खांबलकर, राघोजी सोंडकर यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी सेना, विधी व जनहित विभाग, विद्यार्थी सेना, सहकार सेना, व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व महिला सहभागी झाले होते. पोलीसांचा चोख बंदोबस्त होता.
