
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
नवीन शैक्षणिक वर्षाच्या
स्वागतासाठी सध्या बाजारात पालकांची आणि विद्यार्थ्यांची शालेय साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. उद्यापासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असून, नवीन पुस्तके, नवीन वर्ग आणि नवीन मित्रांना भेटण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये आहे. मात्र, दुसरीकडे शैक्षणिक साहित्याच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याने पालकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.
यंदा शालेय साहित्य खरेदीवर महागाईचे सावट स्पष्टपणे जाणवत आहे. वाहतूक खर्च, मजुरी आणि
२५ ते २० टक्के दरवाढ
प्रामुख्याने कागदाच्या किमती वाढल्यामुळे वह्या-पुस्तकांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याशिवाय गणवेश, पेन, दप्तर, कंपास पेटी, रंगपेटी, वॉटर बॉटल आणि बूट आदी सर्वच स्टेशनरी महागली आहे. विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना तर आणखी
महागडे साहित्य खरेदी करावे लागत असून, एका विद्यार्थ्यांचा हा खर्च चार ते पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तसेच कपडे आणि शिलाईचे दर वाढल्याने गणवेशाचा खर्चही आवाक्याबाहेर गेला आहे.
