

लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप जाधव
उमरखेड तालुक्यातील मेट गावात रेती वाहतूक ट्रॅक्टर द्वारे सावळेश्वर पेंढ वरून व कुपट्टी पेंढ वरून भर दिवसा ट्रॅक्टर रेतीने भरलेला रस्त्यावरून इकडून तिकडे धावते प्रशासन बघून सुद्धा जाणून-बुजून पाठ फिरवत आहे. याचं वेगळच कारण दिसून येते, यामध्ये रेती मनमानी भावाने विकली जात आहे. घरकुल मिळालेल्या गरीब व्यक्तीला 150000 रुपये एवढी रक्कम शासनामार्फत देण्यात येत आहे. तेवढ्या पैशात वाळू,वीट आणावे, सिमेंट,गज व मिस्त्री मजुरी देताना स्वतःच्या खिशातून पैशा उधळपट्टी होत आहे. त्यासाठी मजूर वर्ग व शेतकरी वर्ग पेरणी हंगाम समोर आलेला आहे, पैशासाठी फडफड करताना बळीराजा दिसतो आहे. त्यामध्ये शासकीय रेती विक्री चे कार्य लवकरात लवकर सुरू करावे जेणेकरून विहीर घरकुल साठी आठ हजार रुपये ब्रास रेती साठी मोजावे लागत नाही.अवैद्य रेती तस्करी बंद करण्यात यावी. जेणेकरून लोकांना पैशाचा त्रास होणार नाही. जिथे म्हणतात तिथे पैसेच पैसे लागत आहे. गावातील लोकांने असं मत व्यक्त केलं.
