
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील शेतकरी सतत तीन वर्षापासून कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळाचा सामना करत असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटले आहे. यवतमाळ जिल्हा हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळख आहे या यवतमाळ जिल्ह्यातून राळेगाव तालुक्यात सर्वाधिक कापसाची लागवड केली जात असून तालुक्यात जवळपास ४५ हजार हेक्टरवर लागवड केलेली आहे मात्र मागील वर्षीपेक्षा पांढऱ्या सोन्याच्या भावात दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत घट झाल्याने पांढरे सोने काळवंडल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात खरिपात सुरुवातीला पीक परिस्थिती चांगली असताना जुलै महिन्यात दोनदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते त्यातूनही सावरलेले पिकाचे जोपासना करत थोड्याफार होणाऱ्या कापूस पिकावर शेतकऱ्यांची असलेली भिस्त आता तर आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यानी लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अधिकच चिंता वाढली आहे.
बियाणे खते मशागतीवर केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी नेमकी शेती करायची कशी असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी उपस्थित करीत आहे.कापूस वेचणीला मजूर मिळत नाहीत वेचनीचा दरही दहा रुपये किलो पर्यंत वाढला आहे त्यात बाजारात कमी भाव मिळत आहे .सध्या अवकाळी पाऊस आल्याने कापूस ओला झाला असल्याचा फायदा घेत व्यापारी शेतकऱ्यांचा कापूस ६५०० ते ७००० रुपयापर्यंत घेत असून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलल्या जात आहे.
