
सहसंपादक : रामभाऊ भोयर
ग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था राळेगावणे शेतकरी हितार्थ निर्णय घेत शहरातील शेतकऱ्यांसाठी मोफत पिक विम्याची सोय उपलब्ध करून दिली ज्यामध्ये शहरातील 347 शेतकऱ्यांचा मोफत पिक विमा काढून देण्याचे जबाबदारी राळेगाव ग्राविकाने पूर्ण केली आहेत. हवामानातील बदल वेळेअवेळी पडणारा पाऊस गारपीट यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागते यासाठी शासनाने एक रुपयात प्रधानमंत्री पिक विमा योजना अमलात आणली आहे या योजनेचा प्रचार व प्रसार शासनाने मोठ्या प्रमाणात केला राळेगाव ग्राविकाने सुद्धा यासंदर्भात शहरात दवंडी दिल्ली व शेतकऱ्यांना मोफत पिक विमा काढला जाईल याबद्दल माहिती दिली राळेगाव ग्राविकाने योग्य नियोजन करत 347 शेतकऱ्यांचा मोफत पिक विमा काढून दिला विमा नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन करताना तांत्रिक अडचण येत असल्याने राळेगाव ग्राविकाच्या कर्मचाऱ्यांनी दिवसा सोबतच रात्री उशिरापर्यंत काम करीत विमा काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली याकरिता राळेगाव ग्राविकाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व समस्त संचालक मंडळांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांचा मोफत पिक विमा काढला राळेगाव ग्राविकाचे जेवढे कर्जदार सभासद आहे तितक्याही शेतकऱ्यांचा मोफत पिक विमा ग्राविकाने काढल्याने जिल्ह्यात राळेगाव ग्राविकाने सहकार क्षेत्रापुढे तसेच शेतकऱ्यांसमोर एक मोठा आदर्श ठेवला आहेत.
