
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव शहरातील दैनिक योग वर्ग, पतंजली योग समिती व ग्रामीण विकास प्रकल्प तसेच धन्वंतरी बहुउद्देशीय संस्था व शहरातील सामाजिक संघटनेच्या वतीने सूर्यनमस्कार योगासने ध्यानधारणा अशा योगसाधनेने १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन नगरपंचायत च्या प्रांगणात साजरा करण्यात आला.
या योगसाधनेने प्रत्येकांच्या चेहऱ्यावर शांती आणि समाधानाचे भाव होते. आंतरराष्ट्रीय योग साधनेला प्रमुख उपस्थित अमित भोईटे तहसीलदार प्रफुल चौहाण जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, प्रदीप ठुने शहर अध्यक्ष काँग्रेस हे उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त सर्व योग साधकांनी योग व प्राणायानाचे धडे घेतले यावेळी प्रमुख उपस्थितांनी योगासनाचे महत्त्व त्यांच्या शरीरावर होणारे अनुकूल परिणाम योगामुळे लाभणारे स्वास्थ तसेच प्राणायामाच्या विविध प्रकारामुळे होणारी मनशांती याबाबत सविस्तर माहिती दिली त्यानंतर किशोरवयीन योगसाधक विहान ढुमणे, शाहू खडतकर, प्रणय बुरले, श्रीजीत देशमुख यांनी प्राणायाम व आसनाची प्रात्यक्षिके करून दाखविली तसेच या प्रसंगी डॉ. कोकरे यांचा योग ग्रुप कडून सुंदर अशा योग नृत्य सादर करून दाखविले होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुचित बेरे सर यांनी केले तर योग व प्राणायाम बद्दलची माहिती अँड मोहन देशमुख यांनी उपस्थित योगसाधकांना दिले सदर कार्यक्रमाला दैनिक वर्गाच्या सर्व योग साधकांचे सहकार्य लाभले
