
ढाणकी प्रतिनिधी: प्रवीण जोशी.
जिकडे तिकडे पाणीच पाणी गंगा वाहे चहू बाजूनी अशी गत या रस्त्याची असून सर्वत्र रस्त्याने गंगा वाहते त्या प्रमाणे पाणीच पाणी दिसते,या रस्त्यात पाणी जाण्यासाठी नालीची सुद्धा आवश्यकता आहे .नाली नसल्यामुळे पाणी पुर्णतः रस्त्याने वाहते.
ढाणकी येथील रस्ते अतिशय खडेमय झालेले असून,रस्त्यात ढाणकी येथील प्रभाग क्र.सोळा व सतरा हा रस्ता यात काही अपवाद नाही. या मुख्य रस्त्यात पावसामुळे दोन ते तीन फूट पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना अत्यंत दाहक पद्धतीने त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्यात दवाखाना,मेडिकल, सोसायटी ,नगर पंचायत ,कस्तुरबा गांधी शाळा, गुलाबसिंग ठाकूर शाळा आहेत .शाळेतील चिमुकले,कस्तुरबा गांधी शाळेतील विद्यार्थी ,इथून जाणारा मजूरदार,शेतकरी , तसेच ढाणकी येथील सर्व जनसामान्य लोकांना यातून आणखी किती दिवस त्रास सहन करावा लागेल हे कुणास ठाऊक. या रस्त्यात पाऊस झाला की दोन ते तीन फूट पाणी सर्वदूर रस्त्याने वाहताना दिसते रस्त्यातील खडे दिसे नासे होतात. त्यामुळे कोणती दुर्घटना केंव्हा होऊ शकते सांगता येणे अशक्य आहे.रस्ता हा रहदारीचा असून इथून वाहने चालवताना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. वारंवार नगर पंचायत मध्ये निवेदन देऊन सुद्धा नगर पंचायत कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही.कोणती दुर्घटना झाल्यास यास जबाबदार कोण?असा सवाल जवाब ढाणकी वासी करताना दिसत आहेत. दरवर्षी या रस्त्यात कच्चा मुरूम टाकून थातूर मातुर स्वरूपाचे खड्डे बुजवली जात आहे .मात्र पक्क्या रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींनी अद्याप मागणी केलेली दिसून आलेली नाही.असे गावकरी बोलत आहे.खड्डे बुजविण्यासाठी माळावरील लाल माती मिश्रीत खडक टाकला जातो त्यात खूप मोठमोठाले दगड येत असतात.रस्त्याची समस्या मिटण्या ऐवजी अधिकच गंभीर होत जाते.रस्त्यात टाकलेल्या त्या दगडामुळे,पायाला ठेचा लागत असतात.रस्त्यात पाणी असल्यास दगड सुद्धा दिसत नाहीत.यात दुचाकी कुणाच्या अंगावर जाईल हे सुद्धा सांगता येत नाही.त्यामुळे रस्त्याची डाग डुग करण्याऐवजी रस्ता ,व नाली नवीन बनवण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.अन्यथा गेल्या वर्षी शिवसेनेमार्फत बेशरम लावून आंदोलन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे याही वर्षी सर्व पक्षाचे वतीने तसेच आंदोलन करण्यात येईल की काय असे नागरिकांकडून बोलले जात आहे.
