चिकणी येथे कृषि मार्गदर्शन कार्यक्रम व अंबुजा सिमेंट फाऊंडेशन व कृषि विभाग वरोरा अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वरोरा :- ( चिकणी ) – गुलाबी बोंड अळी व फवारणी करताना घ्यावयाची काळजी या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले .
कृषि विभाग पंचायत समिती वरोरा , व अंबुजा सिमेंट फाउंडेशन च्या सक्तुक्त विद्यमाने कृषि जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम चिकणी ग्रामपंचायत परिसर येथे पार पडला. कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी व फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन व शेतकऱ्यांशी संवाद साधला , त्यांच्या समस्या जाणून घेतल्या शेतकऱ्यांना कसा आथिर्क फायदा होईल व नैसर्गिक साधन संपत्ती ची माती परीक्षण प्रक्रिया, वेगळ्या वेगळ्या विषयांवर शेतकरयांना मार्गदर्शन करण्यात आले . कृषि सेवक श्री टिपले सर , अंबुजा सिमेंट सेवक श्री सचिन नागपुरे , प्रदीप पोटे , सुनील चौधरी “ स्वतःचे रक्त आटवून अविरत कष्ट करून जगाचा पोट भरणारा शेतकरी प्रगती करेल तरच देशाचा विकास होणार . शेतकरी जगेल तर देश जगेल , कृषि विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली च शेतकरी प्रगती करू शकतो. ग्रामपंचायत सदस्य अतुल गावंडे , आनंदरावजी दातारकर , श्रीकांत माथनकर , गजानन येळेकर , बालाजी विरुटकर बंडुजी निब्रड , गणपत खापणे , प्रकाश माथनकर , नितीन माथनकर , शामराव गावंडे , लीलाधर कातरकर गावातील शेतकरी व युवक उपस्थित होते……