
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
दिनांक ८ मार्च २०२३ ला ग्राम पंचायत बोर्डा बोरकर येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. रोहिणी राकेश नैताम सरपंच मॅडम ग्राम पंचायत बोर्डा बोरकर श्रि किशोर ठेंगणे ग्रामसेवक तसेच राहुल कुंभरे उपसरपंच ग्रामपंचायत बोर्डा बोरकर, निलेश नैताम सदस्य ग्राम पंचायत बोर्डा बोरकर, सौ. कल्पना शेडमाके सदस्य ग्राम पंचायत बोर्डा बोरकर, बुरांडे सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा बोर्डा दिक्षित श्री खुशाब मडावी सर जिल्हा परिषद शाळा बोर्डा दिक्षित तसेच डंभारे मॅडम, पिंपळकर मॅडम, जुमनाके सर, पेंदोर सर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा बोरकर तसेच दुधे साहेब पंचायत समिती पोंभुर्णा व लेनगुरे साहेब पंचायत समिती पोंभुर्णा उपस्थित होते तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक जेष्ठ मंडळी बचत गट प्रतिनिधी व ग्राम संघाच्या प्रतिनिधी व गावातील महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवगडे ताई यांनी केले प्रास्ताविक डंभारे मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकात महिला दिनाविषयी मार्गदर्शन केले, श्रि किशोर ठेंगणे ग्रामसेवक यांनी मार्गदर्शन केले तसेच दुधे साहेब पंचायत समिती पोंभुर्णा यांनी महिला दिनाविषयी व योजना बाबत मार्गदर्शन केले विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये सर्व प्रथम संगीत खुर्ची खेळ घेण्यात आला महिलाणी उत्कृष्ट प्रतिसाद दिला व आनंददायी उत्साह निर्माण करुन खेळांचा आनंद घेतला त्यानंतर रस्सी खेच गेम घेण्यात आला, चमचा लिंबू गेम, कब्बडी गेम सर्व खेळात महिलांनी सहभाग घेतला प्रतेक खेळात विजेता खेळाडू ला मा. सौ रोहिणी राकेश नैताम सरपंच मॅडम ग्राम पंचायत बोर्डा बोरकर व ग्राम पंचायत कमेटी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले सरपंच मॅडम यांच्या हस्ते ग्रामसेवक तसेच ग्राम पंचायत अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा बोरकर येथिल सर्व शिक्षक व शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर्डा दिक्षित येथिल सर्व शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नविन गंगापूर येथिल शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला संघनक परिचालक, रोजगार सेवक,ग्राम पंचायत कर्मचारी यांचा मा. सरपंच मॅडम यांनी भेटवस्तू देऊन सन्मानित केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी डंभारे मॅडम पिंपळकर मॅडम उमेश सिडाम दिपक कुणघाटकर रविंद्र भट यांनी सहकार्य केले….
