
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष तारेन्द्र बोर्डे हे सोमवार रोजी राळेगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भेट दिली. यावेळी कार्यालयात यावेळी राळेगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके माजी जिल्हा परिषद सदस्य व भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चित्तरंजन कोल्हे शहर अध्यक्ष डॉ. कुणाल भोयर यांनी नवनिर्वाचित जिल्हा महामंत्री प्रफुल्ल चव्हाण, राजू पडगीलवार,सतीश मानलवार यांनी जिल्हा अध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे शाल श्रीफळ देउन शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यालयात जिल्हा अध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची माहिती दिली तसेच कार्यकर्त्यानी गटबाजी न करता मिळून काम करावे असेही सांगितले आपला गट म्हणजे कमळ असेही बोलून दाखवले. तसेच बैठकीत विविध प्रकारच्या विषयावर चर्चा सुद्धा करन्यात आली तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांची ओळख आमदार अशोक उईके यांनी करून दिली. या कार्यक्रमात माजी पंचायत समिती सभापती प्रशांत तायडे, माजी नगर अध्यक्ष बबन भोंगारे, संजय काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य उषाताई भोयर, इंगोले ताई, संदीप तेलंगे, दिनेश गोहने, शुभम मुके, गजानन लढी तसेच सर्व शक्ती प्रमुख, बुथ प्रमुख व कार्यकरते हजर होते.
