
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव शहरात तालुक्यातून गाव खेड्यातून विद्यार्थिनी शहरात शिक्षण घ्यायला येतात काही दिवसापासून कॉलेज, शाळा, सुरु होत आहे. शाळकरी मुलींना बस स्टॅन्ड, रावेरी पॉईंट,कला वाणिज्य कॉलेज, इंदिरा कॉलेज, विरांनी सायन्स कॉलेज, न्यू इंग्लिश हायस्कूल, तथा इतर महाविद्यालय, या मार्गाने काही बाईक स्वार शाळकरी मुलींना त्रास देतात तसेच मध्यवर्ती बँक समोर मध्य प्राशन करून रोड दुभाजकावर बसून काही युवक धिंगाणा घालत असतात त्याचा सुद्धा त्रास शाळकरी मुलींना तसेच ग्रामीण लोकांना सुद्धा होतो विध्यार्थिनींना शाळेत येणे जाणे करावे लागते त्या मार्गावर काही बेकायदेशीर जमावं तसेच रिकामं टेकडे, रोड रोमिओ, तसेच गुन्हेगारी प्रवृत्ती च्या लोंकाकडून त्रास होतो. विधायर्थिनींना शाळा, महाविध्यलयात जाणे येण्या चा मार्ग सुरक्षित असणे आवश्यक आहे जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना घडू नये
करिता शिवसेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख विनोद काकडे, तालुका प्रमुख विजय पाटील यांच्या मार्गदर्शना खाली
शिवसेना शहर प्रमुख इमरान पठाण यांच्या नेतृत्वात राळेगाव पोलीस स्टेशनं येथे पिएसआय बोरकर साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी उप शहर प्रमुख दिपक येवले, सुनील सावरकर, महिंद्रा तुमाने, शाखा प्रमुख अंकुश गेडाम, शहर संघटक योगेश मलोंढे, निशी पोंगडे,जीवनानरावजी रामगडे, किशोर कापसे, आशिष मरापे, राहुल चव्हाण, आदेश आडे, गौरव ठाकरे,अनिस शेख,
प्रतीक देवतळे, स्वप्नील पुरी,दया आडे, ओम सगमाने,महिला आघाडीच्या पदाधिकारी सुनीताताई ढगले, अनिताताई कांबळे, माया ताई सगमाने, किरण ताई घुणे, वंदना ताई पेंद्राम, काजल ताई पुरी उपस्थित होते
