
सहसंपादक : रामभाऊ भोयर
संगम,(मेंगापुर) विकास इंगोले यांनी गावात पुढाकार घेवून येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंत मोठ्या उत्साहात साजरी केली आहे.
विशेष म्हणजे तालुक्यातील संगम या गावात एकही आंबेडकर अनुयायी नसताना येथीलच विकास इंगोले यांनी गावात पुढाकार घेवून व गावातील नागरिकांच्या विचारला प्रेरित करून डॉ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका बौद्ध जातीचे नसून ते सर्वांचे होते हे पटवून दिले .त्यानंतर येथील गावकऱ्यांनी इंगोले यांच्या शब्दाला अनुसरून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली असून ज्या गावात एकही आंबेडकर अनुयायी नसताना त्या गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची साजरी करण्यात आलेले हे तालुक्यातील पहिले गावं असावे.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीला उपस्थित मा.संगिताताई नगराळे, मा.प्रेरणाताई तागडे, मा.सुनंदाताई निमसटकर व मा.माधुरीताई मेंढे यानी मार्गदर्शन केले. तसेच बालवक्ता संबोधी निमसटकर नी सुंदर मार्गदर्शन केले व मा.प्रेरणा तागडे यानी सुमधुर गितानी कार्यक्रमाला रंगत आणली.
मा.विकास इंगोले यांच्या विचाराने गावातील सर्व लोक प्रेरित होवुन बाबासाहेब आंबेडकर जयंती पुढील वर्षी मोठ्या तन,मन,धनाने व सर्व मिळुन गावात मोठ्या प्रमाणात साजरी करु असे आश्वासन दिले.शेवटी मा.विकास इंगोले यानी मेंगापुर, बोरी, संगम वासीयांचे व वक्त्याचे आभार मानले
