राळेगाव विधानसभा चे नेतृत्व करण्यासाठी नविन सक्षम उमेदवार देण्यासाठी सामाजिक संघटना पुढाकार घेणार……

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव विधानसभा आदिवासी समाजातील (अनुसूचित जमाती ) म्हणून राखीव मतदारसंघ आहे. चाळीस वर्षे झाली या मतदारसंघात काँग्रेसचे प्रतिनिधी यांनी प्रतिनिधित्व केले परंतु अजुन ही समाज व्यवस्था मधील दारीद्रय कमी झाले नाही बेरोजगारी तर तरुणांच्या मस्तकावर लिहिलेली कलंकित रेषा मानली जाते म्हणून तरुणांमध्ये नैराश्य, आणि स्तंलातर, भटकंती हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.( MIDC ) सारखी संकल्पना कांग्रेस ने आणण्यासाठी प्रयत्न केले परंतु अयशस्वी ठरले.आणि म्हणून राळेगाव विधानसभा क्षेत्रात परिवर्तन झाले पाहिजे यासाठी लोकांनी बैठका घेतल्या त्यात सामाजिक संघटना सहभागी झाल्या भाजप शिवसेना सारखे राजकीय पक्ष आपली मोर्चा बांधुनी करु लागले होते. म्हणून दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्षाने लाटेवर आधारित सत्ता परिवर्तन झाले.परंतु या काळात सुध्दा राळेगाव विधानसभा क्षेत्रातील लोकांना अपेक्षा होत्या काही नविन विकास होईल.परंतु विकास कामापेक्षा शेतकरी आत्महत्या, वाघाच्या हल्ल्यात तब्बल १७ लोकांना आपला जिव गमवावा लागला, यांनी सुध्दा सुत गिरणी सुरू करण्याचा मोठा पोपोगांडा केलाय आणि बेरोजगार तरुणांना दोडका दाखवून बेरोजगार तरुणांनाची फसवणूक केली, अशा लोकप्रतिनिधी च्या विरोधात सर्व तरुण पेटुन उठला आहे हे सत्य आहे म्हणून राळेगाव विधानसभा क्षेत्रात विविध सामाजिक संघटना आहे.राजकिय पक्ष आहे आणि माजी मंत्र्यांच्या मतदार संघ आहे म्हणून (२०२४) विधानसभा मतदारसंघ राळेगाव ,(धनशक्ती विरुद्ध जनशक्ती) असा लढा उभा करण्यासाठी सामाजिक संघटना नी पुढाकार घेतला आहे याचं नेतृत्व, विदर्भ राज्य आंदोलन समीती, ग्राम स्वराज्य महामंच, अखिल भारतीय भोई समाज सेवा संघ, शेतकरी संघटना,परिमहा संघ, पारधी समाज संघटना, स्वाभिमानी समाज पक्ष शामादादा कोलाम समाज संघटना अशी अनेक सामाजिक संघटना चे प्रतिनिधी या विषयावर एकत्र आले आहेत यात प्रामुख्याने सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते ,मा.कृष्णाजी भोंगाडे, जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ मा,एम के कोडापे, (परीमहा संघ ) मा, मारोतराव पडाळ अध्यक्ष, भोई समाज सेवा संघ यवतमाळ,मा, मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच,मा नितिन ठाकरे, महादेव सिडाम प्रल्हाद काळे, चारुदत्त नेरकर साहेब आणि अनेक पदाधिकारी या सामाजिक संघटना चे पदाधिकारी या सभेत सहभागी झाले होते